पुणे -पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात दोन जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भोसरी येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १६९ पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या करोनामुक्त व्यक्तींची संख्या १०७ वर पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत ४ जणांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे.
दिलासादायक बाब म्हणजे रविवारी दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण हे भोसरी व खराळवाडी येथील रहिवासी असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर डिस्चार्ज देण्यात आलेले कोरोनामुक्त हे मोशी, रुपीनगर, तपोवन पिंपरी येथील रहिवासी आहेत.