पुणे- विविध कंपनीच्या आलिशान महागड्या मोटारीचे चेसी नंबर बदलून मोटारी विकणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा 1 ने अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल 2 कोटी 19 लाख रुपयांच्या महागड्या चारचाकी गाड्या आणि इंजिन हस्तगत करण्यात आले आहे.
माहिती देताना पोलीस आयुक्त चनप्रित हरविंदरपाल सिंह (वय - 43 वर्षे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपी गॅरेज मालकाचे नाव आहे. त्याच्यावर मोटार चोरीचे पंजाब राज्यात दहा गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याचा साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. चनप्रीत सिंह हा पंजाबमधून चोरीच्या मोटारी आणण्यासाठी विमानाने जात आणि त्यानंतर मोटार घेऊन तो चालवत आणत होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा -'भाजपच्या हिडीस आणि आक्रस्ताळेपणाला आपनं शांततेत सडेतोड उत्तर दिलं'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चनप्रित हरविंदरपाल सिंह याचे पिंपरी-चिंचवडमध्ये गॅरेज असून तिथे चोरीच्या मोटारी येत असल्याची माहिती गुन्हे शाखा-1 च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या पथकाने तेथे जाऊन संबंधित आरोपीला ताब्यात घेतले. गॅरेजमध्ये महागड्या चारचाकी गाड्या आणि त्याचे सुटे पार्ट मिळाले. दरम्यान, चौकशी त्याची कसून केली असताना आरोपी हा त्याच्या साथीदारांसह इतर राज्यातील मोटारी आणून त्याची चेसी बदलून महाराष्ट्रात विकत असल्याचे समोर आले आहे.
आरोपी चनप्रित हरविंदरपाल सिंह हा इन्शुरन्स अपघातातील मोटारी कागद पत्रासह विकत घेत असे. त्यानंतर पंजाब, दिल्ली, हरियाणा या राज्यात सक्रिय असलेल्या टोळीला सांगून त्याचप्रकारची हुबेहूब मोटार चोरण्यास सांगत असे. मोटार चोरल्यानंतर आरोपी हा पंजाबमध्ये किंवा इतर राज्यात विमानाने जात असे. पंजाबमध्ये टोळीने चोरलेली मोटार एखाद्या ठिकाणी पार्क केलेली असायची ती आरोपी घेऊन पिंपरी-चिंचवडला चालवत येत असे. पंजाबमधून आणलेली मोटारीला इन्शुरन्स अपघातातील मोटारीचा चेसी नंबर वेल्डिंग करून लावत आणि पंजाबमधील मोटार महाराष्ट्रातील असल्याचे भासवून लाखो रुपयांना विकत होता.
अशा प्रकारे अनेक गुन्हे त्याने केले असून संबंधित आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याकडून 2 कोटी 19 लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गाड्या पुणे शहर, नवी मुंबई, नागपूर, गोवा, सातारा, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, आळेफाटा भागातून जप्त करण्यात आल्या आहेत. यात 12 आलिशान महागड्या मोटारी आणि 15 इंजिन हस्तगत करण्यात आले आहे.
हेही वाचा -'व्हॅलेन्टाईन डे'ला शेतकरी स्वाभिमानी संघटनेची पुण्यात 'प्रेम यात्रा'