महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CCTV Video- पिंपरी-चिंचवडमध्ये भर दिवसा कोयत्याने वार करून तरुणाचा खून - pune murder news

पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा कोयत्याने वार करुन व दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

सीसीटीव्ही
सीसीटीव्ही

By

Published : Jul 12, 2021, 9:15 PM IST

Updated : Jul 14, 2021, 4:04 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे)- पिंपरी-चिंचवड शहरात भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 11 जुलै) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आकाश उर्फ मकसूद विजय जाधव याला बेड्या ठोकल्या असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आल आहे. कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर, असे खून झालेल्या तरुणाच नाव आहे.

माहिती देताना पोलीस आयुक्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कानिफनाथची पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला आहे. आरोपी आकाश हा कानिफनाथच्या शेजारी राहायचा. पण, दोन वेळा आकाशला तेथील काही तरुणांनी बेदम मारहाण केली होती. ही मारहाण कानिफनाथच्या सांगण्यावरून झाल्याचा संशय आकाशला होता. या घटनेनंतर त्याला इतर ठिकाणी स्थायिक व्हावे लागले होते. याचा राग आकाशच्या मनात होता.

दरम्यान, रविवारी दीड वाजण्याच्या सुमारास कानिफनाथ हा रस्त्यावर तरुणाशी बोलत थांबला होता. त्यावेळी आकाशने अचानक पिशवीमधली कोयता काढत कानिफनाथच्या मानेवर वार केला. बेसावध असलेला कानिफनाथ जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटला. त्याच्या पाठीमागे कोयता घेऊन आकाश धावत होता. काही अंतरावर गाठून कानिफनाथवर कोयत्याने वार करण्यात आले. शिवाय दगडाने ठेवून खून केला. या घटनेनंतर आकाश पळून गेला होता. पण, चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नरहरी नानेकर यांना आकाश हा पत्राशेड येथे लपून बसल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार, सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. यात एक अल्पवयीन सुद्धा सहभागी असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा -85 टक्के पालकांची शाळा सुरू करण्यासाठी संमती, शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून आले समोर

Last Updated : Jul 14, 2021, 4:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details