महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरीमध्ये विनापरवाना पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद - पुणे गुन्हे बातमी

विनापरवाना पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगणारा सराईत गुन्हेगार आकार दत्तात्रय कोठावडे याला खंडणी, दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.

pistal
पिस्तुल

By

Published : Sep 9, 2020, 3:08 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) -पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला खंडणी, दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 30 हजार 400 रुपयांचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

आकाश दत्तात्रय कोठावडे (वय 24 वर्षे), असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृह येथे सराईत गुन्हेगार आकाश कोठावडे हा येणार असून त्याच्याजवळ विनापरवाना गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रवीण कांबळे व आशिष बनकर यांना खबऱ्याकडून मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठिकाणी सापळा रचून सराईत गुन्हेगार आकाश पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. भोसरी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा -
पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा विक्री करणाऱ्याला अटक; 68 हजार रुपयांचा गांजा ज
प्त

ABOUT THE AUTHOR

...view details