पुणे- पाच दिवसांचा आठवडा या राज्य सरकारच्या उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने वेळेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुष्प देत स्वागत करून एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.
पाच दिवसांचा आठवडा सुरू; पुण्यात वेळेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गांधीगिरी - employees
जिल्हा परिषद कर्मचारी वेळेत यावे यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी गांधीगिरीचा अवलंबत वेळेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आले.
गुलाब पुष्प देऊन स्वागत करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले
जिल्हा परिषद कर्मचारी वेळेत यावे यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी गांधीगिरीचा अवलंब केला आहे. वेळेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले. नवीन वेळेनुसार म्हणजे सकाळी पावणे दहापर्यंत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अशाप्रकारे गुलाबपुष्प कर्मचाऱ्यांचा स्वागत करण्यात येणार आहे.
हेही वाचा -चिकन फेस्टीव्हलला पुणेकरांची गर्दी, एक किलोमीटरपेक्षा मोठी रांग
Last Updated : Mar 2, 2020, 11:27 AM IST