पुणे -देशभरात महाशिवरात्र उत्साहात साजरी होत आहे. भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. पुण्यात महाशिवरात्रीनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात जटाधारी शंकराच्या मुखवट्याची 101 किलो चक्क्याद्वारे बनवलेली शिवलिंगाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
पुण्यात महाशिवरात्रीनिमित्त साकारली 101 किलो चक्क्यापासून शिवलिंगाची प्रतिकृती - चक्क्यापासून शिवलिंगाची प्रतिकृती
पुण्यात महाशिवरात्रीनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात जटाधारी शंकराच्या मुखवट्याची 101 किलो चक्क्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
पुण्यात महाशिवरात्री निमित्त साकारली 101 किलो चक्क्यापासून शिवलिंगाची प्रतिकृती
हेही वाचा -भीमाशंकरचे महाशिवरात्रीला वेगळे महत्व
101 किलो चक्क्याचा वापर करून जवळपास 2 तासांच्या कालावधीत 6 कलाकारांनी ही शिवलिंगाची प्रतिकृती साकारली आहे. चक्क्याच्या रूपातील महादेवाचे रूप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी पुणेकर भाविक आवर्जुन मंदिरात येत आहेत.