महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhima Koregaon : भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिनानिमित्त पुणे पोलिसांचा चोख बंदोबस्त, 70 जणांना बजावल्या नोटिसा - पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी

भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिनानिमित्त ( Bhima Koregaon Vijaystambha Day ) चोख बंदोबस्त ठेवण्यात आला ( Police deployment occasion of Bhima Koregaon Day ) आहे. पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूरचे सुनील फुलारी यांनी सांगितले की, अभिवादन करण्यासाठी येण्याऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

Sunil Phulari
सुनील फुलारी

By

Published : Dec 31, 2022, 6:59 PM IST

भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिनानिमित्त पुणे पोलिसांची चोख बंदोबस्त

पुणे : भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिनानिमित्त ( Bhima Koregaon Vijaystambha Day ) पोलिसांनी मोठा बंदोबस्त ( Police deployment occasion of Bhima Koregaon Day ) ठेवला आहे. सगळ काही शांततेत पार पडेल. लागणाऱ्या सर्व उपाययोजना आम्ही चोख पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जनतेला कुठलाही त्रास होणार नाही. अशी माहिती सुनील फुलारी पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूर ( Inspector General of Police Sunil Phulari ) यांनी दिलेली आहे.

4 SRPF च्या तुकड्या तैनात -भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिवस आणि 31 डिसेंबरचा आढावा आज परिक्षेत्र निरीक्षकाने घेतला त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सोशल मीडियावर देखील आमची करडी नजर आहे. रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.अनेक जणांनवर आम्ही करवाई केली आहे. पुणे पोलिसांकडून शांततेच्या बैठकी देखिल घेण्यात आले आहेत असे, फुलारी म्हणाले आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांकडून भिमा कोरेगाव येथे 7 पोलीस अधीक्षक 18 पोलीस उपाधिक्षक, 60 पोलीस निरीक्षक, 120 पोलीस उपनिरीक्षक 2500 अंमलदार, 4 SRPF च्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

एकुण 70 जणांना नोटीस -उद्या सर्वांनी शांततेत येवून अभिवादन करावे अशी विनंती करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी CCTV बसवण्यात आले आहेत. ज्या लोकांना मुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न याआधी निर्माण झाला होता. त्या सर्व लोकांना आम्ही 144 अंतर्गत नोटीस पाठवले आहेत. सोबतच बाहेरून येणाऱ्या लोकांना देखील अशा नोटीस त्या त्या पोलीस स्टेशनला पाठवले आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी एकुण 70 जणांना नोटीस बजावल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार उद्या तिथे घडू देणार नाही अशी माहिती सुनील फुलारी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details