महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवरात्रोत्सोव 2021 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करतात शैलीपुत्री देवीची पुजा, जाणून घ्या काय आहे आख्यायिका? - Navratri 2021

शैलपुत्री ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे हिला शैलीपुत्री नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते.

नवरात्रोत्सोव 2021
नवरात्रोत्सोव 2021

By

Published : Oct 7, 2021, 7:41 AM IST

Updated : Oct 7, 2021, 10:05 AM IST

पुणे -दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे हिला शैलीपुत्री नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. तिचे नाव सती असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.

व्हिडीओ

काया आहे आख्यायिका? -

एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु त्याने शंकराला निमंत्रित दिले नव्हते. आपले वडील मोठे मोठे यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीने तिथे जाण्याची इच्छा प्रकट केली. तिने आपली इच्छा शंकराजवळ बोलून दाखवली. तेव्हा शंकराने तिला सांगितले की, प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे, परंतु मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही, अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही राणी सतीचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली. सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. कोणी तिला आदराची वागणूक दिली नाही. आई बहिणींनीदेखील तिला गळाभेट दिली नाही. सर्व तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिला शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकरा विषयी काही अपमानकारक शब्द वापरले होते, ते पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितलेले योग्य होते, असे तिला वाटायला लागले. आपण येथे येऊन मोठी चूक केली आहे, याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला अग्नीत जाळून घेतले. याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्धस्त केला. सतीने पुढील जन्मात शैल्या हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. या वेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती हेमवती हे तिचेच नाव आहे. शैलपुत्री देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

असे आहे शैलपुरी देवीचे रुप -

शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्ध चंद्र स्थापित आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशुल आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे. नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे. म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारुढा असेही संबोधले जाते. देवी सतीने हिमालय कन्येच्या रुपात जन्म घेतला. तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्र दोष नाहीसा होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा -कोल्हापुरात आदिशक्तीचा आजपासून जागर; श्री अंबाबाईसह ज्योतिबा मंदिर सज्ज

Last Updated : Oct 7, 2021, 10:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details