पिंपरी-चिंचवड (पुणे) - शिवशाही बसचे ब्रेक फेल होऊन आठ वाहनांना बसने धडक दिल्याची घटना आज रविवार (दि. 16 ऑक्टोबर)रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. शिवशाही बस बोरिवलीहून साताऱ्याला जात होती. तेव्हा, पुण्यातील पाषाण तलावापाशी हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
बोरिवली ते सातारा जाताना शिवशाही बसाचा ब्रेक फेल; आठ वाहनांना धडक - On its way from Borivali to Satara
शिवशाही बसचे ब्रेक फेल होऊन आठ वाहनांना बसने धडक दिल्याची घटना आज रविवार (दि. 16 ऑक्टोबर)रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.
बोरिवली ते सातारा जाताना शिवशाही बसाचा ब्रेक फेल झाल्याने वाहनाला धडक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली येथून साताऱ्याला जाणाऱ्या शिवशाही बसला पुण्यात अपघात झाला आहे. या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. शिवशाही साताऱ्याच्या दिशेने जात असताना ब्रेक फेल होऊन समोरील वाहनांना धडक दिली. यात एकूण आठ वाहनांच नुकसान झाले आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.