महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Omitted Bhide's name : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पुराव्या अभावी संभाजी भिडेंचे नाव वगळले - due to lack of evidence

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात (Bhima Koregaon violence case) संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचे नाव पुराव्या अभावी (due to lack of evidence) वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 41 जनाविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

By

Published : May 5, 2022, 12:45 PM IST

पुणे:भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात (Bhima Koregaon violence case) संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविरोधात कुठलेही पुरावे नसल्याने आणि हिंसाचारात संभाजी भिडे यांचा कोणताही सहभाग असल्याचे पुरावे नाहीत (due to lack of evidence) म्हणून त्यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती भिडे गुरुजी यांचे वकील ॲड पुष्कर दुर्गे यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरोधात सन २०१८मध्ये गुन्हा दाखल झाला होता. पण तपासादरम्यान संभाजी भिडे यांचा कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले आहे. तसेच ही माहिती राज्य मानवी हक्क आयोगालाही पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात अनिता सावळे यांनी तक्रार दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details