महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातल्या धनकवडीत संरक्षक भिंत कोसळली; जीवितहानी नाही - संरक्षक भिंत

पुण्यातल्या धनकवडी गावठाण भागात शुक्रवारी सकाळी जुन्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. संरक्षक भिंतीचे काम करण्यात येणार होते. मात्र, पाऊस चालू असल्याने सध्या काम थांबलं होतं असे स्थानिकांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. जुन्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली

भिंत कोसळली

By

Published : Jul 26, 2019, 11:34 AM IST

Updated : Jul 26, 2019, 12:27 PM IST

पुणे - शहरात गेल्या काही दिवसात इमारतीच्या संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी सकाळीही धनकवडी भागात एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यातल्या धनकवडीत कोसळली संरक्षक भिंत; जीवितहानी नाही


पुण्यातल्या धनकवडी गावठाण परिसरात शुक्रवारी पहाटे एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. ही संरक्षक भिंत कोसळून शेजारी असलेल्या घराच्या दरवाजासमोर भिंतीचा मलबा पडला. त्यामुळे दरवाजा बंद होऊन घरातील नागरिक अडकून पडले होते. परिसरातील नागरिकांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या भिंतीच्या मलब्याखाली काही दुचाकी अडकल्या होत्या. दरम्यान महापालिकेचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी संरक्षक भिंतीचा मलबा हटवून या गाड्या बाहेर काढल्या.


ही इमारत आणि संरक्षक भिंत ही तीस वर्ष जुनी असून ती पडण्याच्या अवस्थेत होती. संरक्षक भिंतीचे काम करण्यात येणार होते. मात्र, पाऊस चालू असल्याने सध्या काम थांबवण्यात आले होते, असे स्थानिकांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

Last Updated : Jul 26, 2019, 12:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details