पुणे : उच्च आणि श्रीमंत महिलांसोबत शारीरिक संबंध (Physical Relation with rich women) ठेवण्यासाठी पैशाची ऑफर (offers money for sex) देणारा एक फोन शिवाजीनगर भागातील एका महिलेला आल्याचा धक्कादायक प्रकार (Prostitution In Pune) शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी घाबरलेल्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे (Woman complaint against obscene offer). फिर्यादी नंतर पोलिसांनी दोन अनोळखी महिलांवर कलम 509, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Prostitution In Pune : श्रीमंत महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैशांची ऑफर; पुण्यात धक्कादायक प्रकार
पुण्यामध्ये शारीरिक संबंध (Prostitution In Pune) ठेवण्यासाठी ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून चॅटिंग करून फसवणूक (Online scams in the name of sex) झालेल्यांची संख्या मोठी आहे. आता पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये श्रीमंत घरातील महिलांसोबत शारीरिक संबंध (Physical Relation with rich women) ठेवण्यासाठी पैशाची ऑफर (offers money for sex) करणाराच फोन एका महिलेला आला. (Pune Crime) या महिलेने घाबरून तातडीने पोलिसांमध्ये तक्रार (Woman complaint against obscene offer) दिलेली आहे. (Latest news from Pune)
महिलेला अजब ऑफर :उच्च आणि श्रीमंत महिलांची ओळख करुन देऊ. त्या महिलांसोबत तुम्ही शारीरिक संबंध ठेवायचे. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील अशी ऑफर त्या महिलेला देण्यात आली होती.
शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पैशाची ऑफर :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या शिवाजीनगर परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहतात. शुक्रवारी फिर्यादी यांच्या मोबाईल फोनवर अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. त्यावेळी फोन करणाऱ्या महिलेने फिर्यादी यांना ‘आम्हाला तुम्हाला घरकाम किंवा काही रोजगार द्यायचा आहे. आम्ही तुम्हाला समाजातील उच्च व श्रीमंत महिलांची ओळख करुन देऊ. तुम्हाला त्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील’ अशी ऑफर फोन करणाऱ्या महिलेने फिर्यादी यांना दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहे.