पुणे - विविध मागण्यासाठी ससून रुग्णालयातील परिचारिकांनी आज (26 ऑगस्ट) पुन्हा एकदा आंदोलन छेडले आहे. कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांना सेवा देताना अडचणींंचा सामना करावा लागत आहे. या अडचणींबाबत सतत सांगूनही रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात परिचारिकांची सहा हजार पदे रिक्त आहे ही पदे तातडीने भरण्यात यावी. तसेच तात्पुरत्या परिचारिकांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणीही यावेळी नर्स आंदोलकांनी केली. याशिवाय कोविड कक्षात ड्युटी केलेल्या परिचारिकांना सात दिवसांचा क्वारंटाईन वेळ देण्यात यावा. कोविड कक्षात काम करणाऱ्या परिचारिकांना दर्जेदार पीईपी किट, मास्क, ग्लोव्ह्ज देण्यात यावेत. कोविड कक्षात काम करणाऱ्या परिचारिकेचा जर कोरोनामुळे मृत्यू झाला तर केंद्र सरकारने त्यांच्या कुटुंबासाठी 50 लाखांचा विमा द्यावा. या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
विविध मागण्यांसाठी ससून रुग्णालयातील नर्सचे पुन्हा एकदा आंदोलन - पुणे नर्सेस बातमी
विविध मागण्यांसाठी ससून रुग्णालयांतील परिचारिकांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने घेतला आहे.
आंदोलक परिचारिका