महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक! पुण्यात नवीन कोरोनाग्रस्तांचा आकडा पाचशेच्या आत - पुणे कोरोना बातम्या

सोमवारी कोरोना रुग्णांची आकडेवारी ही पुणेकरांना दिलासा देणारी आहे. पुणे शहरात सोमवारी ४९४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात १४१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

pune corona news
दिलासादायक! पुण्यात नवीन कोरोनाग्रस्तांचा आकडा पाचशेच्या आत

By

Published : May 24, 2021, 8:59 PM IST

पुणे - पुणेकरांना कोरोना संसर्गापासून दिलासा मिळत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. सोमवारी देखील कोरोना रुग्णांची आकडेवारी ही पुणेकरांना दिलासा देणारी आहे. पुणे शहरात सोमवारी ४९४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात १४१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचे प्रमाणदेखील कमी झाले आहे.

सक्रिय रुग्णसंख्या ९ हजार ७२४ इतकी -

सोमवारच्या आकडेवारीनुसार पुण्यात ५५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातले १९ रूग्ण पुण्याबाहेरील होते. तसेच शहरात सध्या १०५९ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४ लाख ६६ हजार ११९ इतकी झाली आहे. तर, सध्या पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या ९ हजार ७२४ इतकी आहे. आतापर्यत शहरात एकूण ८ हजार ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - सार्वभौम सुवर्णरोखे खरेदी करण्याची आहे संधी; जाणून घ्या, सविस्तर माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details