पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ५००वर; तर २४९ जणांना डिस्चार्ज
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांनी पाचशेचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज दिवसभरात १८ रुग्ण आढळले असून, यात तीन शहराबाहेरील रुग्णांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ५०० वर; तर २४९ जणांना डिस्चार्ज
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यात ३ शहराबाहेरील कोरोनाबाधितांचा समावेश आहे. शहरातील कोरोनाबाधितांनी पाचशेचा आकडा ओलांडला असून, एकूण संख्या ५११ वर पोहचला आहे. तसेच ३८ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४९ जणांना घरी सोडण्यात आलेले आहे.