महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चार महिन्यात 3 पालकमंत्री, सोलापूरच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती - new Guardian Minister of Solapur

सुरुवातीला दिलीप वळसे पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली होती. आता पालकमंत्री म्हणून भरणे यांची वर्णी लागली आहे.

सोलापूरच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती
सोलापूरच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

By

Published : Apr 22, 2020, 3:29 PM IST

सोलापूर- जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या जागी भरणे यांना पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

सुरुवातीला दिलीप वळसे पाटील यांना सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली होती. आता पालकमंत्री म्हणून भरणे यांची वर्णी लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात जिल्हा प्रशासनावर नियंत्रण ठेवून योग्य ते खबरदारीचे उपाय करण्यासाठी पालकमंत्री असणे गरजेचे होते.

सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड हे होम क्वारंटाईन झाल्यामुळे ते सोलापुरात आले नव्हते. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये प्रशासनाचा कारभार सांभाळण्यासाठी पालकमंत्री यांची गरज होती. त्यासाठी इंदापूर येथील दत्तात्रय भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details