महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

World Diabetic Day : मधुमेहाच्या रुग्णाला कोणता व्यायाम महत्वाचा? कसं नियंत्रणात आणावं? वाचा खास रिपोर्ट

आज 14 नोव्हेंबर 'जागतिक मधुमेह दिन' (November 14 World Diabetes Day) आहे. जगभरात मधुमेहाचं प्रमाण वाढतं आहे. भारतीयांच्या गेल्या काही वर्षांत बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. भारतात दरवर्षी १० लाखांहून अधिक लोकांचा मधुमेहामुळे मृत्यू होतो आहे. जाणुन घेऊया मधुमेहाच्या रुग्णासाठी कोणता व्यायाम (what exercise important diabetic patient) महत्वाचा आहे आणि मदुमेहाला नियंत्रणात (how to control diabetes) कसं आणावं? Dr Pradeep Awte .

World Diabetic Day
जागतिक मधुमेह दिन

By

Published : Nov 6, 2022, 6:44 PM IST

पुणे : भारतातच नाही, तर जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मधुमेहाचा थेट परिणाम शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर होतो. जर एखाद्याला मधुमेह असेल तर, त्याला खाण्यापिण्याबाबत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यासोबतच आहाराबाबत नेहमीच काळजी घ्यावी लागते. बदलती जीवनशैली आणि वाढलेले वजन हे मधुमेहाचे मुख्य कारण असते. तेव्हा मधुमेह रुग्णांनी कोणता व्यायाम (what exercise important diabetic patient) करावा तसेच मधुमेह नियंत्रणात (how to control diabetes) आणायचा असेल तर, काय केलं पाहिजे? याबाबत डॉ प्रदीप आवटे (Dr Pradeep Awte) यांनी माहिती दिली आहे. November 14 World Diabetes Day .

प्रतिक्रिया देतांना डॉ प्रदीप आवटे



ज्या प्रमाणे आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव बघितला, तसाच मधुमेह हे हळूहळू वाढणारी साथ आहे. देशात प्रत्येक पाचव्या माणसाला मधुमेह आहे. हे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. हे आजार जीवनशैली च्या माध्यमातून होत असतो. यात रक्त शर्करा नियंत्रित करणे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे, एक तर टाळा आणि जाळा म्हणजेच कॅलरीज घेणं टाळणे आणि दुसरं म्हणजे योग्य प्रकारचा व्यायाम या दोन गोष्टींमुळेच मधुमेहावर योग्य ते नियंत्रण आणू शकतो, असं यावेळी आवटे म्हणाले.



मधूमेह जर नियंत्रणात आणायचं असेल तर, आहारात कारबो हायड्रेड कमी करणे होय. तसेच हिरवे पालेभाज्या आणि सलाद यांचा वापर आहारात जर एक चतुर्थ केला तर, स्वाभाविक यातून साखर तयार होत नाही. दुसरा म्हणजे दरोरोज नियमित व्यायाम केला पाहिजे. त्यात चालणे हे देखील महत्त्वाचं आहे. यात गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाणारे व्यायाम हे सर्वात महत्त्वाचे आहे. चुकीचा आहार आणि चुकीचा व्यायाम हे मधुमेह होण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात आणायचा असेल तर, नियमित व्यायाम आणि योग्य आहार हे देखील महत्त्वाचं आहे, अशी माहिती यावेळी आवटे यांनी दिली.

मधुमेहामुळे हृदयरोग, किडनीचा आजार तसंच डोळ्यांच्या समस्या निर्माण होतायत. असं असलं तरी मधुमेहावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. त्यासाठी जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या २०१७च्या अहवालानुसार जगभरात मधुमेहाचे ७ कोटींहून अधिक रुग्ण आहे. २०३४पर्यंत जगभरात १३ कोटींहून अधिक रुग्ण असण्याची शक्यताय. रुग्णांनी आपली मधुमेहाची पातळी एक टक्क्यांनीही कमी केली तरी मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. त्यामुळे पॅरालिसिसचा धोका १२ टक्के कमी होऊ शखतो.

हार्ट अॅटॅकचा धोका १४ टक्के कमी होऊ शकतो. किडनीचे आजार ३३ टक्के तर मधुमेहामुळे अवयव कापण्याच्या शक्यतेत ४३ टक्के कमी होऊ शकतात. एचबीए १ सीचा स्तर ५ टक्क्यांहून खाली असल्यास व्यक्तीची प्रकृती उत्तम मानली जाते. एचबीए १ सी एक ब्लड टेस्ट आहे. त्याची तीन महिन्यांनी टेस्ट करावी. त्यानुसार भारतात मधुमेह प्रचंड वाढत असल्याचं दिसतंय. आरोग्य उत्तम राखण्यासाठी सर्वांनी मधुमेहाची चाचणी करून घेणं आवश्यक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details