पुणे :शहरातील वेश्या व्यावसायच्या माध्यमातून आपले आर्थिक बस्तान बसविणार्या व संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या या कुख्यात कल्याणी देशपांडे सह दोघांना न्यायलयाने शिक्षा ठोठावली आहे. पुण्यातील कोथरूड भागात एका सोसायटीत वेश्याव्यवसाय चालविणारी दलाल कल्याणी देशपांडेसह ( Kalyani Deshpande ) दोघांना विशेष न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरी आणि 10 लाखाचा ( 7 years of hard labor and fine of 10 lakhs ) दंड ठोठावला आहे.
Kalyani Deshpande : कुख्यात कल्याणी देशपांडेला 7 वर्ष सक्तमजुरी व 10 लाखांचा दंड, काय आहे प्रकरण...
पुणे शहरातील कोथरूड भागात एका सोसायटीत वेश्याव्यवसाय चालविणारी दलाल कल्याणी देशपांडेसह ( Kalyani Deshpande ) दोघांना विशेष न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरी आणि 10 लाखाचा ( 7 years of hard labor and fine of 10 lakhs ) दंड ठोठावला आहे.
काय आहे प्रकरण : पुणे शहरात संघटीतपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी कल्याणी देशपांडे (वय-46) हिच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. शहरातील चतु:श्रृंगी, कोथरूड,विश्रांतवाडी, हिंजवडी आदी पोलीस ठाण्यात तिच्यावर 20 पेक्षाअधिक गुन्हे दाखल होते. कल्याणीला ऑगस्ट २०१६ मध्ये अटक करण्यात आली असून ती सध्या येरवडा जेलमध्ये आहे.
मोक्काच्या गुन्ह्यातील पहिलीच शिक्षा : पिटा आणि मोक्काच्या गुन्ह्यातील झालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचे बोलले जात आहे. अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी या प्रकरणात युक्तीवाद करताना दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.