पुणे - रावण टोळीतील कुख्यात गुंड चिम्या उर्फ अमोल निजाप्पा गायकवाड याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल हस्तगत करण्यात आले. मोक्का कलम लागलेला चिम्या २०१७ पासून फरार होता.
रावण टोळीने पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, आकुर्डी, वाकड, रावेत अश्या विविध ठिकाणी काही वर्षांपासून उच्छाद मांडलेला आहे. या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली आहे. टोळीतील अनेक सदस्यांनी वाहनांची तोडफोडही केलेली आहे. त्यानुसार विनोद गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई केली होती. त्यानंतर त्याचा भाऊ चिम्या सक्रिय झाला, त्याच्यावरही मोक्का लावण्यात आला.