महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Notice to Rohit Pawar : दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून मला नोटीस, रोहीत पवारांचा रोख नेमका कुणाकडे? - मध्यरात्री दोन वाजता आमदार रोहित पवारांना नोटीस

Notice to Rohit Pawar : आमदार रोहित पवारांच्या बारामतीतील बारामती ऍग्रो प्लांट 72 तासांत बंद करण्याची नोटीस आल्याची माहिती रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत दिलीय. महाराष्ट्र प्रदूषण विभागाकडून ही नोटीस आली आहे. दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून मला नोटीस पाठवल्याची प्रतिक्रिया आमदार रोहीत पवारांनी दिलीय.

Notice to Rohit Pawar
Notice to Rohit Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 5:56 PM IST

बारामती Notice to Rohit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामतीतील बारामती ऍग्रो या प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण विभागानं कारवाई केल्याची माहिती समोर आलीय. यासंदर्भात मध्यरात्री दोन वाजता आमदार रोहित पवारांना नोटीसही देण्यात आलीय. या नोटीसमध्ये 72 तासांत प्लांट बंद करण्याचे आदेस देण्यात आल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत दिलीय.


रोहित पवारांचे ट्वीट काय : "दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली." असं त्यांनी आपल्या म्हटलंय. तसंच 'युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे. हा लढा मी लढणारच आहे, असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे, त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो. परंतु, आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळं या नेत्यांना अपेक्षित असलेलं काहीही साध्य होणार नाही. तसंच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही-आमदार रोहित पवार


सत्याच्या आधारे न्यायालयात लढा :आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबानं काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त 'गिफ्ट' दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो. परंतु, राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट' देईल, ही खात्री आहे. सर्वसामान्यांच्या कामाला अनेक महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील, अस आमदार रोहित पवार म्हणालेत.

हेही वाचा :

  1. Rohit Pawar News : निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा अंदाज आहे, पण न्यायालयावर विश्वास - रोहित पवार
  2. CM Post Banner : पवार घराण्यातील आणखी एक सदस्य भावी मुख्यमंत्र्यांच्या रांगेत; झळकले बॅनर
  3. Rohit Pawar Met Ajit Pawar : सरकारमध्ये फक्त अजित पवारच कार्यक्षम; रोहित पवारांकडून स्तुतीसुमने

ABOUT THE AUTHOR

...view details