पिंपरी-चिंचवड (पुणे) -नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मालमत्ता कर भरण्यासंबंधी जप्तीपूर्व नोटीस आलेली आहे. ही नोटीस पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी आली असल्याचे त्यांनी सांगितले.
गिरिश प्रभुणे यांच्या बातचीत करताना प्रतिनिधी तब्बल 1 कोटी 77 लाख भरण्यासंबंधी नोटीस
प्रभुणे यांच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेला तब्बल 1 कोटी 77 लाख मालमत्ता कर भरण्यासबंधी नोटीस बजावण्यात आली आहे, असे प्रभुणे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे. दरम्यान, पद्मश्री पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच नोटीस आली असल्याचेही ते म्हणाले.
नोटीस व पुरस्काराचे काहीच संबंध नाही
मालमत्ता कर भरण्यासंदर्भात मागील महिन्यांत म्हणजेच डिसेंबर महिन्यात पहिली नोटीस आली होती. दहा दिवसांपूर्वी म्हणजेच पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी जप्तीपूर्वीची नोटीस आली आहे. यामुळे नोटीस व पुरस्काराचे काहीच संबंध नाही, असे प्रभुणे म्हणाले.
कोण आहेत प्रभुणे
गिरीश प्रभुणे यांनी पारधी आणि भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे काम केले आहे. यमगरवाडी व मगरसांगवी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी या समाजातील शिक्षणाचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. अनेक कुटुंबांचे त्यांनी पुनर्वसनही केले.
हेही वाचा -एल्गार परिषदेत झळकले कोरेगाव-भीमा दंगलीसंदर्भातील अटकेतील कार्यकर्त्यांचे पोस्टर