पुणे -कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पवार यांना ४ एप्रिलला आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत या तारखेत बदल होणार नाही अथवा पुढची तारीख मिळणार नाही, असेही या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.
पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असणाऱ्या अनेकांची धरपकड केली. यातील 9 जण सध्या अटकेत आहेत.