महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

2000 Note Ban : नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची भाजपची पद्धतशीर योजना - धंगेकर - Printing of 2000 notes already stopped

नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची भाजपची पद्धतशीर योजना असल्याची टीका काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप सरकारवर केली आहे. पहिल्या नोटाबंदीमध्ये अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना रांगेत उभे राहून आपला जीव गमवावा लागला आहे. हा मास्टर स्ट्रोक नसून देशाचे नुकसान करणारा स्ट्रोक आहे असल्याचे धंगेकर म्हणाले.

MLA Ravindra Dhangekar
MLA Ravindra Dhangekar

By

Published : May 19, 2023, 10:51 PM IST

रविंद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया

पुणे : रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा आदेश जारी केला आहे. परंतु सध्याच्या नोटा अवैध ठरणार नाहीत. सर्वसामान्य नागरिक ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये या नोटा बदलू शकतात. वीस हजार रुपयांपर्यंतच्या नोटा एकावेळी बदलल्या जातील. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, इतर मूल्यांच्या चलनाची पुरेशी उपलब्धता झाल्यानंतर दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचे लक्ष्य साध्य करण्यात आले आहे. RBI ने 2018-19 मध्ये दोन हजारच्या नोटांची छपाई आधीच बंद केली होती. आता कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी यावर मत व्यक्त केले.

काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही पद्धतशीर योजना आहे. काही दिवसात भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली दिसेल - रविंद्र धंनगेकर, आमदार, काँग्रेस

देशाचे मोठे नुकसान :पहिल्या नोटाबंदीमध्ये अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना रांगेत उभे राहून आपला जीव गमवावा लागला आहे. हा मास्टर स्ट्रोक नसून देशाचे नुकसान करणारा स्ट्रोक आहे. अशा प्रकारे देश चालणार नाही. हे सरकार चुकीचे निर्णय घेत आहे. या नोटाबंदीमध्ये मोठा भ्रष्टाचार होणार असून आगामी काळात त्यात भाजपचे लोक दिसणार असल्याचे धंगेकर म्हणाले. या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना अर्थशास्त्र कळत नाही. बरेच तज्ञ हे सांगत आहेत. रावणाचा अहंकार त्यांच्यात रुजला असून आता जनता त्यांचा उद्धटपणा उतरवणार आहे अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी दिली आहे.

30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलल्या जातील:रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 'क्लीन नोट पॉलिसी'च्या अनुषंगाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण 2000 च्या नोटा कायदेशीर राहतील. ही प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आणि जनतेला पुरेसा वेळ देण्यासाठी सर्व बँकांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. 2000 ची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्या. त्याच्या जागी नवीन 500 आणि 2000 च्या नोटा नव्या पॅटर्नमध्ये जारी करण्यात आल्या.

असा घेतला निर्णय :निर्णयाचे स्पष्टीकरण देताना, आरबीआयने सांगितले की सुमारे 89 टक्के दोन हजार रुपयांच्या नोटा मार्च 2017 पूर्वी जारी करण्यात आल्या होत्या. चलनात असलेल्या या नोटांचे एकूण मूल्य 31 मार्च 2018 रोजी 6.73 लाख कोटी रुपयांवरून 3.62 लाख रुपयांवर घसरले आहे. 31 मार्च 2018 रोजी असेही निदर्शनास 2000 रुपयांची नोट सामान्यतः व्यवहारांसाठी वापरली जात नाही. तसेच, इतर मूल्यांच्या नोटांचा साठा लोकांच्या चलनाची गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे.

हेही वाचा -

  1. Serious Allegations Against Thackeray : ठाकरे कुटुंबाकडून वसूल केली जाते खंडणी, भाजपच्या 'या' आमदाराने केला मोठा गौप्यस्फोट
  2. Sanjay Raut visit to Nanded : लोकसभेत जिंकलेल्या 19 जागांवर शिवसेनेचाच उमेदवार असेल -संजय राऊत
  3. Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना 24 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण

ABOUT THE AUTHOR

...view details