महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहरात उत्तर भारतीय बांधवांनी साजरा केला छठ पूजा सण - पिंपरी-चिंचवडमध्ये उत्तर भारतीय बांधवांनी साजरा केला छट पूजा सण

उत्तर भारतीय बांधवांचा छठ पूजा हा सण पिंपरी-चिंचवडसह इतर शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. छठ पूजेच्यावेळी पर्यावरणाच्या समृद्धीसाठी महिलांनी प्रार्थना केली. मोशीच्या इंद्रायणी घाटावर नदीच्या कडेला थांबून सूर्याची पाच ते सहा तास महिलांनी पूजा केली.

छट पूजा सण

By

Published : Nov 5, 2019, 12:45 PM IST

Updated : Nov 5, 2019, 1:07 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात उत्तर भारतीय बांधवांचा छठ पूजा हा सण मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय बांधव मोशीच्या इंद्रायणी घाटावर एकत्रित आले होते. विश्व श्रीराम सेना संघटनेने पुढाकार घेऊन लाल बाबू गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली छठ पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवडमध्ये छट पूजा साजरी

हेही वाचा -प्रवाशाचे मोटारीत विसरलेले पैसे पोलिसांनी शोध घेऊन केले परत

उत्तर भारतीय बांधवांचा छठ पूजा हा सण पिंपरी-चिंचवडसह इतर शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. छठ पूजेच्यावेळी पर्यावरणाच्या समृद्धीसाठी महिलांनी प्रार्थना केली. मोशीच्या इंद्रायणी घाटावर नदीच्या कडेला थांबून सूर्याची पाच ते सहा तास महिलांनी पूजा केली. मात्र, सध्या नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यावर तोडगा निघणे गरजेचे असल्याचे मत आयोजक लाल बाबू गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -राज्यात आठ नोव्हेंबरपर्यंत पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

उत्तर भारतीयांसाठी सगळ्यात महत्वाचा असणारा सण म्हणजे छठ पूजा, दिवाळीत ही पूजा केली जाते. पिंपरी चिंचवड शहरात हजारो उत्तर भारतीय बांधवांनी एकत्र येत ही मनोभावे पूजा केली. विश्व श्रीराम सेनेच्यावतीने मागील वर्षीप्रमाणे मोशीतील इंद्रायणी घाटावर छठ पूजेनिमित्त रविवारी पहाटे पाचच्या सुमारास भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सूर्यषष्ठी महाव्रत आरंभ महापूजा, छोटी छठ केली गेली. सूर्याची उपासना करण्यासाठी छठ पूजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचीन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्‍या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील इंद्रायणी घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छठ लोकगीत सादर करण्यात आले.

Last Updated : Nov 5, 2019, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details