पुणे - महामेट्रोचे प्रमुख ब्रिजेश दिक्षित यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातल्या डेक्कन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महामेट्रोच्या प्रमुखांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल; निवडणूक आचारसंहिता भंगचा ठपका - Non Bailable Offence
महामेट्रोचे प्रमुख ब्रिजेश दिक्षित यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा अदखलपात्र गुन्हा दाखल
पुणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सुचनेनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामेट्रोचे प्रमुख ब्रिजेश दीक्षित यांनी 13 मार्चला पत्रकार परीषद घेतली होती.आचार संहिता लागू झाली असल्याने मेट्रो प्रकल्पाच्या कामाबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल्याचा आणि सत्ताधाऱ्यांना सहकार्य केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.