'आरक्षण मिळुन देखील आंदोलकांवर गुन्हे दाखल होत असतील आरक्षण तर काय कामाचे' - maratha
मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. असे असून देखील आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरुच आहे. असे असेल तर आरक्षण काय कामाचे असा प्रश्न शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष राम गावडे यांनी उपस्थित केला आहे.
आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घेण्याची मागणी
पुणे -जिल्ह्यातील चाकण येथील आंदोलनादरम्यान अनेकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सरकारने आता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मात्र, आरक्षण मिळवुन स्वत:चे आणि समाजाचे भविष्य घडविणाऱ्यांवर जर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत असतील, तर हे आरक्षण काय कामाचे? असा प्रश्न शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष राम गावडे यांनी पोलीस उपविभागीय आधिकारी यांना पत्र देऊन उपस्थित केला आहे.