पुणे- महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसना सीएनजीचा (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) पुरवठा २४ मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यावर उत्तर देताना पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी कोणत्याही बसेस बंद राहणार नसून तत्काळ थकबाकी देण्यात येणार असून बसेसची सेवा सुरुच राहणार असल्याचे सांगितले.
पुणे शहरात बसेस बंद पडणार नाहीत, सीएनजी पुरवठा पूर्ववत होईल - pune transportation
एमएनजीएलने थकबाकीच्या रकमेत जीएसटी दाखवल्यामुळे थकबाकीची रक्कम ५० लाखापर्यंत गेली.
एमएनजीएलने थकबाकीच्या रकमेत जीएसटी दाखवल्यामुळे थकबाकीची रक्कम ५० लाखापर्यंत गेली. यावरुन पीएमपीएमएल आणि एमएनजीएलमध्ये वाद असल्याचे त्यांनी सांगितले. यावर तोडगा म्हणून तत्काळ २४ कोटी रुपये एमएनजीएलला देण्याचे ठरले आहे. याबाबत पीएमपी, पीसीएमसी महापौर आणि अधिकाऱ्यांनी एमएनजीएलबरोबर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
बाकी थकबाकीही लवकरच देण्यात येणार असल्याचे टिळक यांनी सांगितले. महागरपालिकेच्या पीएमपीएमएला देण्यात येणाऱ्या संचलन तुटीतुन ही थकबाकी चुकविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.