महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी दुपारी दोननंतर 'नो एन्ट्री' - सुट्टीच्या दिवशी

सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवून तासंतास वाहन अडकून पडल्याचे दिसून येथे आहे.

पुणे

By

Published : Jul 16, 2019, 10:55 AM IST

पुणे- सुट्टीच्या काळात पुणेकरांचे पर्यटनासाठी आवडीचे ठिकाण असलेल्या सिंहगड किल्ल्यावर आता सुट्टीच्या दिवशी दुपारी दोन वाजल्यानंतर जाता येणार नाही. सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवून तासंतास वाहन अडकून पडल्याचे दिसून येथे आहे.

वाहतूक कोंडी होत असल्याने सुट्टीच्या दिवशी दुपारी दोननंतर सिंहगडावर 'नो एन्ट्री'

या रविवारी 14 जुलैलासुद्धा सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन तब्बल पाच तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गडावरही मोठी कोंडी झाली होती. या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी स्थानिक पातळीवरील विभागांची समन्वय बैठक घेऊन सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी दुपारी दोननंतर बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खडकवासला चौपाटीवर पार्किंग करता येणार नाही, अशी भूमिकाही घेण्यात आली आहे.

या समन्वय बैठकीला पाठबंधारे विभागाचे अधिकारी, सिंहगडचे उपसरपंच, नांदोशीचे सरपंच तसेच पोलीस अधिकारी, मंडळ अधिकारी उपस्थित होते. सुट्टी आणि गर्दीच्या दिवशी चौपाटी परिसरात हात गाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर तेथे वाहने उभी करता येणार नाहीत. वाहने उभी करण्यासाठी स्थानिक जागा असलेल्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यामुळे पाण्यात उतरण्याससुद्धा बंदी घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या उपाययोजना करण्यात येऊन त्यांची माहिती देणारे फलकही लावण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details