महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तबलिगी मरकझ: पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्यांपैकी दोन जण 'पाॅझिटिव्ह'...

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून ३२ जण शहरात आले होते. पैकी २२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आरोग्य आणि पोलीस प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, रात्री सहा जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला असून आज दोन जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

nizamuddin-markaz-2-people-positive-of-corona-from-pimpri-chinchwad
nizamuddin-markaz-2-people-positive-of-corona-from-pimpri-chinchwad

By

Published : Apr 2, 2020, 3:25 PM IST

पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. या कार्यक्रमातून परतलेला पिंपरी-चिंचवड शहरातील दोघांना कोरानाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्यांपैकी दोन जण 'पाॅझिटिव्ह'...

हेही वाचा-धक्कादायक : खासगी रुग्णालयाच्या एका चुकीमुळे ३ दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून ३२ जण शहरात आले होते. पैकी २२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आरोग्य आणि पोलीस प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, रात्री सहा जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला असून आज दोन जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आणखी काही जणांना पोलीस रुग्णालयात दाखल करण्यास घेऊन आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details