महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तबलिगी मरकझ: पुणे विभागातीलही 106 जणांचा सहभाग... - corona virus news

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातील लोकांमध्ये कोरोना आढळून आला आहे. त्यामुळे त्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या 182 जणांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. यामध्ये पुणे विभागात 106 जण आढळले आहेत. तर उर्वरीत नागरिकांचा शोध सुरू असल्याची माहिती, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

nizamuddin-markaz-106-people-from-pune-area
पुणे विभागातीलही 106 जणांचा सहभाग...

By

Published : Apr 1, 2020, 4:03 PM IST

Updated : Apr 1, 2020, 4:45 PM IST

पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातील लोकांमध्ये कोरोना आढळून आला आहे. त्यामुळे त्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या 182 जणांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. यामध्ये पुणे विभागात 106 जण आढळले आहेत. तर उर्वरीत नागरिकांचा शोध सुरू असल्याची माहिती, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागातील 106 जणांचा सहभाग...

हेही वाचा-सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात, शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन

मिळालेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील 136, सातारा जिल्ह्यातील 5, सांगली जिल्ह्यातील 3, सोलापूर जिल्ह्यातील 17 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करताना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त 7 व्यक्ती आहेत. 182 पैकी 106 जण पुणे विभागात आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 70, सातारा जिल्ह्यातील 5, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 व सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील 106 जणांना ट्रेसिंग करुन त्यातील 94 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याच्या थुंकीचे स्त्राव नमुने तपासली जातील. त्याचा अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील 51 व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे. तर उर्वरित तपास गतीने सुरू आहे. काही प्रकरणात काहींनी मोबाईल सिमकार्ड बदलले असल्याचीही माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यात ज्यांचे संपर्क आढळून आले ती माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुण्यातील 51 जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील 182 जणांचा तपास सुरू असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल व त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

Last Updated : Apr 1, 2020, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details