पुणे- वाहनांच्या प्रदूषणाने दिवसेंदिवस हवेचे प्रदूषण वाढत आहे. वाहनांचे प्रदूषण रोखण्यासाठी धूर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, पीयुसी सेंटरच्या माध्यमातून बोगस प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले. चक्क केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या चारचाकी वाहनाचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - नारायणगावात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला
दिल्लीतील वाहनाला पुण्यातून प्रमाणपत्र दिले गेले आहे. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांच्या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात संगमेश्वर पियुसी सेंटरचे श्रीमंत बाब शेट्टी कामन्ना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पीयूसी सेंटरचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
हेही वाचा - रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याला आग.. आग्निशामक दल घटनास्थळी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत कामन्ना यांचे जंगली महाराज रस्त्यावर श्री संगमेश्वर पियुसी सेंटर आहे. 14 सप्टेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीने गाडी न आणता येथून पियुसी प्रमाणपत्र घेतले आहे. प्रत्यक्षात गाडी नसतानाही, गॅस ऍनलायझर मशीनद्वारे पाहणी न करता श्रीमंत बाब शेट्टी कामन्ना याने पियुसी प्रमाणपत्र दिले आहे.