महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राचा पुढचा 'मुख्यमंत्री' शिवसेनेचाच होणार - नितीन बानगुडे

शिवसेनेच्यावतीने शिवशाहीचे महत्व सांगणारी 'मी महाराष्ट्र मोहीम' महाराष्ट्रभर सुरू आहे. बुधवारी चाकण व आळेफाटा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रा. नितीन बानगुडे पाटील

By

Published : Sep 18, 2019, 9:33 PM IST

पुणे- मुख्यमंत्री पदावरून राज्यात शिवसेना-भाजपत वाद सुरू असताना बुधवारी पुन्हा शिवसेना नेते प्रा. नितीन बानगुडे यांनी या वादात उडी मारून नव्या वादाला तोंड फोडले आहे. "महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार" असे वक्तव्य बानगुडे यांनी केले. चाकण व आळेफाटा येथे बुधवारी शिवसेनेच्यावतीने आयोजित 'मी महाराष्ट्र मोहीम' या कार्मक्रमात ते बोलत होते. शिवशाहीचे महत्व सांगणारी ही मोहीम महाराष्ट्रभर सुरू आहे.

चाकण व आळेफाटा येथे बुधवारी शिवसेनेच्यावतीने आयोजित 'मी महाराष्ट्र मोहीम' या कार्मक्रमात बोलताना प्रा. नितीन बानगुडे

'महाराष्ट्र घडवायचा आहे ना? मग फक्त फेसबुक, व्हाट्सअपवर बोलणारे नको तर प्रत्यक्षात करून दाखवणारे व्हा, असे आवाहन बानगुडे पाटलांनी यावेळी केले. तसेच शिवसेनेत दाखल व्हा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पुणे जिल्ह्यातील आळेफाटा व चाकण येथे या मोहिमेच्या वेळी प्रा. बानगुडे, माजी खासदार शिवाजी आढळराव उपस्थित होते. त्यावेळी बानगुडे यांनी हे विधान केले.

हेही वाचा- ..तर लोक आम्हाला वेडे समजतील - आदित्य ठाकरे

भाजप व शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे सुरू

विधानसभेचे बिगुल वाजण्यास काही तास बाकी असताना खेड-आळंदी मतदारसंघात शिवसेना व भाजपाने युतीची वाट न पाहता स्वतंत्र मेळावे घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातुन मंगळवारी भाजपाने मोठे शक्तिप्रदर्शन करत स्वत: ची एक वेगळी ताकद दाखवुन दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अद्याप शांतता पहायला मिळत आहे.

हेही वाचा- विधानसभेत ईव्हीएम हॅक होणार नाही, त्यामुळे सत्ता आमचीच - प्रकाश आंबेडकर

ABOUT THE AUTHOR

...view details