महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसने थकवल्याने मुख्यमंत्री महाबळेश्वरला सुट्टीवर'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब महाबळेश्वरला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा खासगी दौरा असल्याचे सांगितले जात आहे. यावर नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री ठाकरेंना थकवले आहे. त्यामुळेच ते सुट्टीला गेले आहेत, असे राणे म्हणाले.

आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे

By

Published : Feb 2, 2020, 1:26 PM IST

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने थकवल्यामुळे ते महाबळेश्वरला सुट्टीवर गेले आहेत, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. मावळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राणे बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसने थकवल्याने मुख्यमंत्री महाबळेश्वरला सुट्टीवर


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब महाबळेश्वरला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा खासगी दौरा असल्याचे सांगितले जात आहे. यावर नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री ठाकरेंना थकवले आहे. कॅबिनेटमध्ये या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचेच चालते. शिवसेनेचे मंत्री हे टेबलावरील पेन आणि फाईल उचलण्यासाठीच असून ते कारकुनासारखे बसलेले असतात, अशी टीका राणे यांनी शिवसेनेवर केली.

हेही वाचा - 'या घटना संशयास्पद, हल्लेखोरांचा बोलवता धनी कोण?'

देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री होते पण, त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील सहा वर्षांपासून देशसेवा करत आहेत. मात्र, ते गुजरातला आईकडे सुट्टीवर गेले असे ऐकले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नवीन मुख्यमंत्री ६० दिवसातच थकले आहेत, त्यामुळे थेट महाबळेश्वरला गेले.

मावळ येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास गायकवाड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 5 हजार शेतकरी आणि मजूर महिलांना त्र्यंबकेश्वरच्या देवदर्शनाला पाठवले आहे. यावेळी आमदार नितेश राणे, खासदार संजय काकडे हे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details