महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे कोरोना अलर्ट : दिवसभरात 9 जणांचा मृत्यू तर, 182 नवीन रुग्णांची नोंद - पुणे कोरोना अलर्ट

पुण्यात आज कोरोनामुळे 9 जणांचा बळी गेला असून तब्बल 182 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सात हजारांवर जाऊन पोहोचला आहे.

दिवसभरात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू
दिवसभरात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू

By

Published : Jun 5, 2020, 9:45 PM IST

पुणे - शहरात आज दिवसभरात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. तर, नव्याने182 रुग्णांची भर पडली आहे. सोबतच, आज कोरोनामुक्त झालेल्या 170 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यात आज कोरोनामुळे 9 जणांचा बळी गेला असून तब्बल 182 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची लागण झालेले 7 हजार 447 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 4 हजालर 675 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर, आज दिवसभरात बरे झालेल्या 170 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 2 हजार 402 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 370 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सात हजारांवर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details