बारामती(पुणे)- शहरातील आणखी ९ जणांना कोरोना झाला असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. काल शहरात सापडलेल्या रूग्णांच्या संपर्कातील ६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच ३ नवीन रुग्ण शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीतील कोरोनाबाधितांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे.
बारामती शहरात ९ कोरोनाबाधित वाढले; रुग्ण संख्या ४९ वर - Baramati corona update
९ कोरोनाबाधित वाढल्याने बारामतीतील रुग्णसंख्या ४९ वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहरातील जळोजी वसंतनगर, पानगल्ली भागात शनिवारी ३ नवीन रुग्ण सापडले होते. त्यांच्या संपर्कातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली. ३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बारामती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे शहरात व तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धोकादायक ठरत असून बारामतीकरांची व प्रशासनाची चिंता वाढली आहे.