महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोबाईल, ट्रकसह १६ किलो गांजा हस्तगत; निगडी पोलिसांची कारवाई - अल्पवयीन

निगडी पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत १२ जणांना अटक केली असून पैकी ६ जण अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून ३६ मोबाईल, ९ दुचाकी, १ ट्रक आणि १६ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. हे सर्व निगडी, पिंपरी, चिंचवड, काळवाडी, आकुर्डी या भागात चोरी करायचे.

निगडी

By

Published : Jul 26, 2019, 9:54 PM IST

पुणे- निगडी पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत १२ जणांना अटक केली असून पैकी ६ जण अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून ३६ मोबाईल, ९ दुचाकी, १ ट्रक आणि १६ किलो गांजा निगडी पोलिसांनी हस्तगत केला आहे. या सर्वांची किंमत तब्बल १६ लाख रुपये आहे.

मोबाईल, ट्रकसह १६ किलो गांजा हस्तगत; निगडी पोलिसांची कारवाई

६ अल्पवयीनसह अभिषेक लक्ष्मण भोसले (वय-१९), विशाल उर्फ जंगल्या हिरालाल लष्करे (वय-२०), अजय अनिल साबळे (वय-२०), विजय मारुती शिंदे (वय-३५), सोमनाथ लक्ष्मण पंदीखोडे आणि मंटू चंद्रभूषण पासवान (वय-४६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी परिसरात निगडी पोलीस गस्त घालत असताना एका दुचाकीवरून जाणाऱ्या संशयित तीन जणांना पकडले. त्यांच्याकडे दोन चाकू आढळले असून अभिषेक, विशालसह एका अल्पवयीनला त्यावेळी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी निगडी, भोसरी, चिखली, चिंचवड, काळेवाडी, परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २८ मोबाईल, दोन दुचाकी आणि एक कोयता हस्तगत करण्यात आला, तर दुसऱ्या कारवाईत, मोहम्मद खलील शेख याने निगडी पोलिसात मोबाईल चोरी गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्याचा तपास घेऊन अजय साबळे याला निगडी पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून ८ मोबाईल हस्तगत करण्यात आले.

तिसऱ्या घटनेत, तीन अल्पवयीन मुलांकडून ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. चौथ्या कारवाईत ट्रक चोरी करणाऱ्या विजय आणि सोमनाथ या आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली. पाचव्या कामगिरीत निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती हा ओटास्कीम येथे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस कर्मचारी किशोर पेंढार आणि विलास केकान यांना मिळाली. त्यानुसार संबंधित ठिकाणी सापळा लावून मंटू पासवान याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १६ किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, गुन्हे पोलीस निरीक्षक निकाळजे, पोलीस कर्मचारी प्रवीण मुलूक, विलास केकान, ढोले, मावसकर, व्होनमाने, बोकड, मिसाळ, गेंगजे, दिवटे, यादव, साळुंखे आणि चौधरी यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details