पुणे- गुरूवारी भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 1945 साली पार पडलेल्या शिमला कॉन्फरन्सचे दुर्मिळ चित्रीकरण पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दाखल झाले आहे. रॉयल इंडियाचे ऑफिसर विल्यम ग्लेडहिल टेलर यांनी चित्रीत केलेली ही चित्रफीत 12 मिनिटांची आहे. शिमला कॉन्फरन्सला भारतातील अनेक मोठे नेते उपस्थित होते, त्यांची झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.
ऐतिहासिक 'शिमला कॉन्फरन्स'चा दुर्मिळ व्हिडिओ, महात्मा गांधीसह या बड्या नेत्यांची झलक - मास्टर तारासिंग
शिमला कॉन्फरन्सला भारतातील अनेक मोठे नेते उपस्थित होते, त्यांची झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. महात्मा गांधी, मौलाना आझाद, राजेंद्र प्रसाद, सी गोपालचारी, मोहमद अली जिना, मास्टर तारासिंग, भुलाभाई देसाई, जी बी पंत हे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत
महात्मा गांधी, मौलाना आझाद, राजेंद्र प्रसाद, सी गोपालचारी, मोहमद अली जिना, मास्टर तारासिंग, भुलाभाई देसाई, जी बी पंत हे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या कॉन्फरन्सच्या आधी महात्मा गांधी Lord Wavell यांना भेटण्यासाठी जातानचे दृश्यही यात टिपले गेले आहेत.
ही कॉन्फरन्स 25 जून ते 14 जुलै 1945 च्या दरम्यान शिमला येथील व्हॉइस रेगल लॉज येथे पार पडली. यावेळी विल्यम टेलर यांनी चित्रीत केलेला हा व्हिडिओ त्यांच्या मुलीने इंग्लडमधून पाठवला आहे. विल्यम यांचा 2010 मध्ये मृत्यू झाला. तिनं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, की या व्हिडिओची क्वालिटी उत्तम नसली तरीही या ऐतिहासिक प्रसंगातील महत्त्वाच्या नेत्यांना यात टिपण्यात माझ्या वडिलांना यश आले.