पुणे :पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शंभुसृष्टी उभारण्यासाठी देखील सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी त्यांनी यावेळी सांगितले. आज छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने किल्ले पुरंदर येथे शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हि माहिती दिली. या कार्यक्रमाला आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजी महाराजांचे बलिदान देशाची प्रेरणा : परकीय आक्रमाणाच्यावेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांचे बलिदान आजही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे. छत्रपती संभाजी महाराज युद्धात तरबेज होते. तसेच ते न्यायनिवाडा करण्यात निष्णात होते असे चंद्रकांत पाटील यांनी बोलतांना सांगितले. आदर्श प्रशासन कसे असावे याचा आदर्श संभाजी महाराजांनी एक आदर्श समोर ठेवला आहे. अशा महापुरुषांची जयंती साजरी करतांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू जाणून घेणे आवश्यक आहे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
संभाजी महाराजांचा त्याग समाजापुढे येणे महत्वाचे :या भूमीत, या मातीत छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. आम्ही लहान पणापासूनच याठिकाणी छत्रपती यांना वंदन करण्यासाठी येत असतो. कोण काय करत आहे, कोण श्रेय घेत आहे यापेक्षा आज छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा करूया. जे कोणी श्रेय वाद करत असतील त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर देऊ. श्रेय वादापेक्षा छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेलं योगदान, त्यांनी दिलेलं त्याग हा समजापुढे येणे महत्त्वाचं आहे, असे आमदार संजय जगताप यांनी म्हटले आहे.