पुणे - राज्यात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातल्या ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. जेथे 25 टक्के किंवा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत, अशा जिल्ह्यांना पूर्ण अनलॉक केले जाणार आहे. या जिल्ह्यांच्या यादीत सध्यातरी पुणे जिल्ह्याचे नाव नाही. त्यामुळे सोमवारी (7 जून) पुण्याच्या अनलॉकचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहरात पॉझिटिव्हीटी रेट कमी
राज्य सरकारने अनलॉक केल्या जाणाऱ्या जिल्ह्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यात पुणे जिल्हाचा समावेश नाही. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 10 लाख 23 हजार 771 पॉझिटिव्ह रुग्ण आजपर्यंत आढळले आहेत. सध्या 22 हजार 725 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सरकारने जाहीर केलेल्या स्तरांमध्ये पुणे जिल्हा पॉझिटिव्हीटी रेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतो. त्यामुळे पुणे जिल्ह्याची अद्यापही अनलॉकमधून सुटका झालेली नाही. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पुणे ग्रामीणपेक्षा कमी आहे.
पुणे ग्रामीणचा पॉझिटिव्हीटी रेट ज्यास्त