पुणे -येथील पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी दिवसभरात शहरात कोरोनाबाधित ६ रुग्ण आढळले आहेत. यात तीन महिला आणि तीन पुरुष आहेत. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ४० वर पोहचली असून २८ रुग्णांवर पिंपरी-चिंचवड शहरातील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पुण्यातील रुग्णालयात पिंपरी-चिंचवडमधील इतर तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, १२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले कोरोनाचे सहा नवे रुग्ण, शहरातील एकूण संख्या ४० वर - corona effect
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी शहरात एकूण ६ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी शहरात एकूण ६ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात तीन महिला आणि तीन पुरुष असून सर्व महिला या ५० वर्षाच्या पुढील आहेत. तर, पुरुषांमध्ये एका २९ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. शहरात ऐकून ४० जण पॉझिटिव्ह असून १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित २८ रुग्णांवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे, अशा परिस्थितीत देशातील लॉकडाऊन ३ मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.