पुणे -पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आ. लाड यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासो मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी सभापती किसन जानकर यांची उपस्थिती होती.
नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांचा जयंत पाटलांच्या हस्ते सत्कार - पुणे लेटेस्ट न्यूज
पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आ. लाड यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
अरुण लाड यांचा जयंत पाटलांच्या हस्ते सत्कार
यावेळी बोलताना आमदार अरुण लाड म्हणाले की, माझ्या विजयाचे सर्व श्रेय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जाते, त्यांच्या सहकार्यामुळेच मी ही निवडणूक जिंकली. तसेच मला मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मी परत एकदा आभार मानतो. मी पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असेही त्यांनी यावेळी म्हटले.