महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी दूध पिऊन नववर्षाचे स्वागत - मानवी साखळीचे आयोजन पुणे बातमी

आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय, कात्रज डेअरी, पुणे शहर पोलीस वाहतूक विभागातर्फे या मानवी साखळीचे आयोजक करण्यात आले होते. यावेळी डेक्कन जवळील गुडलक चौकात दारु नको, दूध प्या या कार्यक्रमांतर्गत मानवी साखळी व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

new-year-welcome-rally-in-pune
व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी दूध पिऊन नववर्षाचे स्वागत

By

Published : Jan 1, 2020, 10:19 AM IST

पुणे- नववर्षाचे स्वागत व्यसनमुक्तीतीचा संकल्प करून करावे, याकरिता नववर्षाच्या पूर्वसंध्येला विविध सामाजिक संस्था, महाविद्यालयातील तरुणाईने मानवी साखळीतून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. दारू नको, दूध प्या, असे म्हणत यावेळी प्रबोधन करण्यात आले.

व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी दूध पिऊन नववर्षाचे स्वागत

हेही वाचा-'आरे' प्रकरणी वादग्रस्त अधिकारी अश्विनी भिडे यांची प्रधान सचिव पदी बढती

आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय, कात्रज डेअरी, पुणे शहर पोलीस वाहतूक विभागातर्फे या मानवी साखळीचे आयोजक करण्यात आले होते. यावेळी डेक्कन जवळील गुडलक चौकात दारु नको, दूध प्या या कार्यक्रमांतर्गत मानवी साखळी व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार गिरीष बापट, रा. स्व. संघाचे महेश करपे, केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीष बापट म्हणाले की, आनंद आणि उन्माद यांच्या सीमारेषा ओळखता आल्या पाहिजे. आपल्या आनंदात दुसऱ्याला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. चांगल्या गोष्टी सामावून घेणारी भारतीय संस्कृती आहे. मात्र, वाईट गोष्टींना यामध्ये येऊ देता कामा नये. बेशिस्तपणे नव्हे, तर चांगल्या पद्धतीने नववर्षाच्या स्वागतासाठी सरत्या वर्षाला तरुणाईने निरोप द्यायला हवा.

डॉ.अजय दुधाणे म्हणाले की, मानवी साखळीमध्ये सहभागी झालेली तरुणाई व्यसनमुक्ती सोबतच आपले डोके आपल्या हाती, दारुचा पाश जीवनाचा नाश, हेल्मेट घाला अपघात टाळा, ध्वनीप्रदूषण टाळा सारखे सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृती करीत होती.

दरम्यान, व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला योग्य दिशा दाखविण्याकरिता मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेतला. यावेळी दारू नको दूध प्या, हा संदेश देत दूध वाटप करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details