महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : घरी बसूनच करावे लागणार नववर्षाचे स्वागत - नववर्ष स्वागत

हॉटेल खुले ठेवण्यासाठी रात्री 10:45 वाजेपर्यंत वेळ दिलेली असल्याने रात्री 12 वाजता करण्यात येणारे सेलिब्रेशन आता नागरिकांना घरीच करावे लागणार आहे.

कोरोना इफेक्ट : घरी बसूनच करावं लागणार नववर्षाचे स्वागत
कोरोना इफेक्ट : घरी बसूनच करावं लागणार नववर्षाचे स्वागत

By

Published : Dec 31, 2020, 1:17 PM IST

पुणे - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत यंदा साधेपणाने केले जाणार आहे. हॉटेल खुले ठेवण्यासाठी रात्री 10:45 वाजेपर्यंत वेळ दिलेली असल्याने रात्री 12 वाजता करण्यात येणारे सेलिब्रेशन आता नागरिकांना घरीच करावे लागणार आहे.

कोरोना इफेक्ट : घरी बसूनच करावे लागणार नववर्षाचे स्वागत

दरवर्षी होते गर्दी -

दरवर्षी पुणे शहरात धुमधडाक्यात नववर्ष साजरे केले जाते. काही दिवस आधीच त्याची तयारीही केली जाते. शहरातील फर्ग्युसन रोड, कॅम्प परिसर या भागात तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करण्यासाठी येत असतात पण यंदा कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्वांना घरातूनच नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे.

हॉटेल व्यावसायिक हिरमुसले -

नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल व्यावसायिक दरवर्षी मोठ्या प्रमाणात पार्टीचे नियोजन करत असतात. विविध ऑफरही ठेवण्यात येत असतात पण यंदा 31 डिसेंबरला पुणे शहरात कोरोना संसर्गामुळे हॉटेल सुरू ठेवण्यासाठी रात्री 10:45 वाजेपर्यंतची वेळ दिलेली असल्याने हॉटेल व्यवसायिकांचा हिरमोड झाला आहे. आधीच लॉकडाऊनचा फटका त्यात आता नववर्षाच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details