पुणे -पुणे शहरात अनलॉक संबंधी आणखी पाऊल टाकण्यात आले आहे. सोमवारपासून शहरासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा -कोरोना काळात विनायक मेटेंनी मोर्चे न काढता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी - उदय सामंत
पुणे -पुणे शहरात अनलॉक संबंधी आणखी पाऊल टाकण्यात आले आहे. सोमवारपासून शहरासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा -कोरोना काळात विनायक मेटेंनी मोर्चे न काढता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी - उदय सामंत
सरकारने राज्यात अनलॉक करत असताना लेव्हलनुसार नियमावली केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यात लेव्हल 4 नुसार नियम असल्याने लॉकडाऊन मधून फारशी शिथिलता मिळलेली नव्हती. मात्र, पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात 10 टक्क्यांच्यावर पॉझिटिव्हिटी, तर शहरात मात्र 5 टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हिटी असल्याने शहरात शिथिलता मिळावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार आता पुण्यात महापालिका आयुक्तांनी शहरासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये सोमवारपासून शहरातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, मैदाने पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील. सामाजिक, धार्मिक आणि मनोरंजन कार्यक्रमांसाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर, लग्नसमारंभासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीला परवानगी आणि व्यायाम शाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. पीएमपीएमएल 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी.