पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये आईने ३ मुलांचा खून करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (28 जुलै) घडली होती. या घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. मृतांमधील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेत एका संशयित नातेवाईकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, मृत आईवर मुलांचा खून केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी दिली.
तीन मुलांचा खून करून आईची आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड - Police Commissioner Ram Jadhav
पिंपरी-चिंचवडमध्ये आईने तीन मुलांचा खून करून गळफास घेतल्याची घटना रविवारी घडली. यातील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका नातेवाईकाला अटक केली आहे.
तीन मुलांचा खून करून आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी भोसरीमध्ये घडली होती. मृत महिलेचे वय २८ वर्षे आहे तर, एका मुलीचे वय ७ आणि दुसऱ्या मुलीचे वय ९ वर्ष होते. आई, पीडित मुली आणि एक मुलगा हे घरीच होते. रविवारी मृत महिलेचा पती सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडला. यानंतर आईने मुलांना गळफास लावून खून केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली. ही घटना पती घरी आल्यानंतर उघडकीस आली. दरम्यान, मुलांचा खून कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही. मुलींवर लैंगिक अत्याचार कोणी केले हे समोर आलेले नाही.या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे करत आहेत.