पुणे :शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच आता यामुळे दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना आढळून येत आहे. मागील दोन दिवसात पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात तब्बल 33 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 27 रुग्ण हे पुणे शहरातील, 3 पुणे ग्रामीण परिसरातील तर 3 जिल्ह्याबाहेरचे आहेत.
पुण्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे ७५० नवे रुग्ण, ३३ मृत्यू - पुणे कोरोना अपडेट्स बातमी
आज (मंगळवार) दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 750 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 728 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 874 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 750 नवे रुग्ण
आज (मंगळवार) दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 750 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 728 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 874 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यात कोरोनाची बाधा झालेले एकूण 29 हजार 107 रुग्ण सापडले आहेत. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 18 हजार 824 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 9 हजार 409 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील 513 रुग्ण गंभीर असून यातील 198 जण व्हेंटिलेटरवर आहेत.