महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-मुंबई मार्गावरील 'मेगा ब्लाॅक'मुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द; जाणून घ्या नवीन वेळापत्रक - रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या

30 नोव्हेंबरपर्यंत मेगा ब्लाॅक असल्याने गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम होणार आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले आहेत, तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

मेगा ब्लाॅक

By

Published : Nov 16, 2019, 3:02 AM IST

पुणे- मध्य रेल्वेच्या पुणे - मुंबई मार्गादरम्यान मंकी हिल ते कर्जत दरम्यान विविध कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये बदल झाले आहेत, तर काही रेल्वे गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.

30 नोव्हेंबर पर्यंत हे काम चालणार असून गाड्याच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या, वळवण्यात आलेल्या तसेच निर्गमणाची स्थळे बदलण्यात आलेल्या रेल्वे गाड्या खालील प्रमाणे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या -
• 51027 मुंबई - पंढरपूर 30.11.2019 पर्यंत रद्द
• 51028 पंढरपूर - मुंबई 30.11.2019 पर्यंत रद्द
• 51029 मुंबई - बीजापूर 27.11 पर्यंत रद्द
• 51030 बीजापूर - मुंबई 28.11 पर्यंत रद्द

दौंड - मनमाड मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या -

• 11025 भुसावल - पुणे
• 11026 पुणे - भुसावल

मुंबई ऐवजी पुण्यावरुन सुरु करण्यात आलेल्या गाड्या -
• 11029 मुंबई - कोल्हापूर गाडी पुण्यापासून सुरू करण्यात आली आहे.
• 11030 कोल्हापूर - मुंबई गाडी पुण्यापर्यंतच असणार आहे.

लांब पल्ल्याच्या खालील गाड्या मुंबई पर्यंत न जाता पुण्यापर्यंतच असतील, तसेच मुंबईतून न सुटता पुण्यातून सुटतील -

• 17317 हुब्बल्ली - एलटीटी
• 17318 एलटीटी - हुब्बल्ली
• 12702 हैदराबाद - मुंबई
• 12701 मुंबई - हैदराबाद
• 18519 विशाखापट्टनम - एलटीटी
• 18520 एलटीटी - विशाखापट्टनम
• 17614 नांदेड - पनवेल
• 17613 पनवेल - नांदेड

ABOUT THE AUTHOR

...view details