पुणे -पुण्यातील शिवणे येथे महिलेने एका तरुणाला ( Young Boy Killed In Pune ) मारहाण केल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता या प्रकरणात अनेक नवीन खुलासे होताना ( Pune Youth Murder Case New Revelations ) पाहायला मिळत आहेत. या मुलाची हत्या कट रचून करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण -नगरमध्ये राहणाऱ्या प्रद्युम्न प्रकाश कांबळे याचे शिवणे येथे राहणाऱ्या प्राजक्ता पायगुडे हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी प्राजक्ताने प्रद्युम्नला फोन करुन बोलावून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. यावेळी प्राजक्ताच्या घरातील सदस्यांनी प्रद्युम्नला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यात प्रद्युम्नचा मृत्यू झाल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर प्राजक्ता पायगुडे, अजय पायगुडे, विजय पायगुडे, वंदना पायगुडे आणि सागर राठोड या 5 जणांना वारजे पोलिसांनी अटक केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.