महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंता वाढली, पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 163 कोरोनाबाधित रुग्ण; आकडा 3 हजारांच्या घरात - कोरोना रुग्णसंख्या पिंपरी चिंचवड बातमी

पिंपरीमधील एका 60 वर्षीय व्यक्तीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकूण 71 जणांचा कोरोनामुळे मृत्यू आहे. यामुळे, शहरातील एकूण बाधितांचा आकडा 2 हजार 722 वर पोहोचला आहे. आत्तापर्यंत एकूण 71 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ही आकडेवारी ग्रामीण आणि शहरी भागातील आहे. तर, 1 हजार 804 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 163 कोरोनाबाधित रुग्ण
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 163 कोरोनाबाधित रुग्ण

By

Published : Jun 28, 2020, 9:02 PM IST

पुणे -जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवार) नव्याने 163 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे, शहरातील एकूण बाधितांचा आकडा 2 हजार 722 वर पोहचला आहे. दरम्यान, आज 115 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

पिंपरीमधील एका 60 वर्षीय व्यक्तीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकूण 71 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ही आकडेवारी ग्रामीण आणि शहरी भागातील आहे. तर, 1 हजार 804 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज बाधित आढळलेले रुग्ण हे केशवनगर कासारवाडी, पिंपळे सौदागर, विकासनगर देहूरोड, गवळीनगर भोसरी, गणेशनगर डांगे चौक, आदर्शनगर पिंपरी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, आकुर्डी, नेहरुनगर पिंपरी, लांडेवाडी भोसरी, विठ्ठलनगर पिंपरी, दळवीनगर, महात्मा फुलेनगर भोसरी, काशिद पार्क पिंपळे गुरव, डिलक्स चौक पिंपरी, शगुन चौक पिंपरी, संत तुकारामनगर भोसरी, रिव्हर रोड पिंपरी, कुदळे चाळ पिंपरी, नव महाराष्ट्र विद्यालय पिंपरी, बौध्दविहार पिंपरी, मिलिंद नगर पिंपरी, कैलासनगर थेरगाव, महाराष्ट्र कॉलनी, सुभाष नगर पिंपरी, वालकन सोसायटी पिं. निलख, गुलाबनगर पिंपरी, तानाजीनगर चिंचवड, विजय अपार्टमेंट ‍पिंपरीगाव, गणेशनगर भोसरी, पाटीलनगर चिखली, दिघीरोड भोसरी, वैभवनगर पिंपरी, तापकीरनगर काळेवाडी, रंजक कॉलनी, इंद्रायणीनगर भोसरी, गणेशनगर दिघी, रुपीनगर निगडी, बापुजी बुवामंदिर पिंपळे गुरव, इंदिरानगर चिंचवड स्टेशन, आदर्शनगर काळेवाडी, भारत मातानगर दिघी, इंदिरानगर चिंचवड, संभाजीनगर, यमुनानगर ‍निगडी, जयगणेश साम्राज्य भोसरी, सुदर्शनगर चिखली, भारतमाता हौ. सो. वाल्हेकरवाडी, ‍चिखली, शाहुनगर चिंचवड, पटेलगार्डन जुनी सांगवी, किर्ती रुग्णालयाजवळ पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, कोकणेनगर काळेवाडी, वाकड, शिवाजीवाडी मोशी, कुदळे चाळ पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर चिंचवड, शास्त्रीनगर पिंपरी, दापोडी, वसंतदादा पाटील नेहरुनगर, वाल्हेकरवाडी, नढेनगर, काळेवाडी, नंदनवन कॉलनी भोसरी, नम्रता कॉलनी थेरगाव, जवळकर चाळ कासारवाडी, हिराबाई झोपडपट्टी कासारवाडी, चिकन चौक निगडी, बौध्दनगर, आनंद विहार रावेत, हडपसर, मंगळवार पेठ, चाकण, कोंढवा, जुन्नर येथील रहिवासी आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details