पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी नव्याने 98 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 863 वर पोहचली असून, सोमवारी 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. शहर आणि ग्रामीण परिसरातील 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर आतापर्यंत अकराशेहून अधिक जण करोनामुक्त झालेले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले दिवसभरात 98 कोरोनाबाधित; 4 जणांचा मृत्यू
सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश असून एका पुरुषाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दापोडी येथील 52, पिंपरी येथील 52 तर बोपोडी येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
कोरोनाबाधित आढललेले रुग्ण -
सोमवारी पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण हे जुनी सांगवी, कामगार भवन पिंपरी, शंकरनगर, अंजठानगर, पिंपळेनिलख, पिंपरी, दत्तनगर, तापकिरनगर काळेवाडी, नढेनगर काळेवाडी, मधुबन सोसायटी जुनी सांगवी, संतज्ञानेश्वर कॉलनी पिंपरी, सुदर्शन नगर चिंचवड, मोरेश्वर कॉलनी थेरगांव, सृष्टी हॉटेल पिंपळे गुरव, विशालनगर पिंपळे निलख, सिध्दार्थनगर दापोडी, काटेपुरम चौक पिंपळे गुरव, कोकणेनगर काळेवाडी, नाशिक हायवे मोशी, दिघीरोड भोसरी, बोपखेल, विशालनगर पिंपळेनिलख, किनारा हॉटेल दापोडी, मोरयापार्क पिंपळेगुरव, पिंपरी, नवभारतनगर दापोडी, संभाजीनगर चिंचवड, सोनिगरा चिंचवड, आदर्शनगर काळेवाडी, पाटीलनगर चिखली, इंदिरानगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, नानेकरचाळ पिंपरी, वल्लभनगर पिंपरी, जयभीमनगर दापोडी, मोशी, पंचतारारोड आकुर्डी, सिंधुनगर प्राधिकरण, देहूरोड, नेहरुनगर, विजयनगर काळेवाडी, महात्माफुलेनगर भोसरी, वैशालीनगर पिंपरी, संततुकारामनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, दत्तमंदीर वाकड, थेरगांव, बोपोडी, देहूगांव, देहूरोड, मंगळवारपेठ पुणे येथील रहिवासी आहेत.
कोरोनामुक्त रुग्ण -
सोमवारी पीसीएमसी बिल्डिंग अजंठानगर, पीसीएमसी बिल्डिंग निगडी, आनंदनगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, भिमाशंकर नगर दिघी, लिंबोरेवस्ती दापोडी, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, निगडी, पारोळा जळगाव, कसबापेठ पुणे येथील रहिवाशी असलेल्या नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.